कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षात महाराष्ट्राचा विकास
तर सोडाच उलट राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवला. आज राज्यावर ३ लाख कोटीचे
कर्ज त्यांनी करून ठेवले, अशी घणाघाती टिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांनी केला. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेवारांच्या प्रचारार्थ
आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. वाशीम बाजार समितीच्या प्रांगणावर दुपारी ३
वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मोठ्या संख्येत महिला व
पुरुष उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर वाशीम विधानसभा मतदार संघाचे
भाजपाचे उमेदवार आमदार लखन मलिक, रिसोड मतदारसंघाचे उमेदवार विजयराव जाधव,
कारंजा मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश
लुंगे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, गोवर्धन चोथमल,
माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापर्यंत मुसलमानांना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती दाखवून मते मागितली. शोले चित्रपटातील ‘जब रात को बच्चा रोता है तो मॉं कहती है ! बेटा सोजा नही तो गब्बरसिंग आ जायेगा’ हा संवाद म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करा नाही तर नरेंद्र मोदी निवडून येतील, अशी भीती त्यांनी मुसलमानांना दाखवली, असे गडकरी म्हणाले. मात्र, आता या दोन्ही पक्षांनी गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्राची पार वाट लावली आहे. सिंचनावर ७० हजार कोटी खर्च झाल्याचे कॉंग्रेस आघाडीवाले सांगतात. मात्र, प्रत्यक्षात केवळ ०.५ टक्के सिंचन झाल्याचे सरकारी अहवाल असल्याचे सांगून, राज्यातील उद्योग बंद पाडून आघाडी सरकारने बेकारी वाढवली, असा आरोपही त्यांनी केला.
याउलट भाजपाचे सरकार केंद्रात आल्यावर साडेचार कोटी नागरिकांचे बँकेत खाते उघडण्यात आले. प्रधानमंत्री सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. नदी जोडणी प्रकल्प पुन्हा हाती घेण्यात आला आहे. २५ लाख विद्यार्थ्यांसाठी स्कील डेव्हलपमेंट योजना सुरू करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
आबा, बाबा, दादांच्या गाड्या आता भंगारात जमा करा आबा, बाबा, दादा या तिकडीने महाराष्ट्राची पुरती वाट लावली आहे. या तिकडींच्या गाड्या आता भंगारात जमा केल्या पाहीजे. त्यांनी सत्तेचा वापर प्रचंड प्रमाणात मलिदा खाण्यासाठी केला. एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत असताना हे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले त्यांच्याकडे असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाची दुकानदारी जोरात सुरू आहे. तेव्हा, हे सर्व प्रकार बंद करण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे एकछत्री राज्य आणा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

0 comments:
Post a Comment